सत्ताधाऱ्यांनी सरकारी पैशाच्या जोरावर ‘लाडली बहना’, ‘लाडकी बहीण’ असले ‘खेळ’ करणे देशासाठी नुकसानकारक आहे…
लोकांना उपजीविकेसाठी सरकारने प्रत्यक्ष मदत करणे, हे अयोग्य आहे. ज्यांचे उत्पन्न बेतासबात आहे, अशा कुटुंबांतल्या मुलामुलींना चांगले दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी व्यवस्था करणे हे श्रेयस्कर ठरते. त्याशिवाय अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तू परवडणाऱ्या भावात मिळतील, अशी व्यवस्था बऱ्याच देशांनी स्वीकारली आहे. या पलीकडे कुणालाही उपजीविकेसाठी सरकारने पैसा उचलून देणे, हे अयोग्यच नव्हे, तर हानीकारकही आहे.......